Tuesday, December 12, 2006

गेले दयायचे राहुनी--आरती प्रभू

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा

--आरती प्रभू

2 comments:

YASHRAJ said...

Hi very nice

anand w said...

aprathim...thanx...bye..