मला नाही वाटत
मला नाही वाटत, मला कोसळत्या पावसात भिजता येइल,
तुझे माझे नाते मला अलवार जपता येइल,
तुझे दुख तुझे गुपित तुझ्या डोळ्यान्मधून मला कळते,
तुझ्यापासून अन्तर राखताना माझे मन जळते,
पण माझ्यावर विश्वसून कोणी सात पावले चालले आहे,
माझ्या श्वासात, माझ्या विश्वात माझ्यासाठीच जगले आहे,
तुझ्यासाठी कवाडे उघडल्यावर खिडकीपाशीच थाम्बता येइल का?
मातीचे ग पाय माझे मला आकाश पेलता येइल का?
मला आकाश पेलता येइल का?
2 comments:
Couldn't say any more than
It touched to my heart with tears in eyes
Gud poem ... too gud :)
Post a Comment