Tuesday, October 17, 2006

पारिजात - - अभिजीत दाते

आज उन्मळून पडलो वादळात मी...

तुझ्या अंगणी होतो पारिजात मी...

तुझे येणे येता येता राहून गेले ,

होतो त्या वळणावर वाट पहात मी...

पालवीच्या स्वप्नांवरती जगलो तरीही ,

झडतच गेलो प्रत्येक वसंतात मी...

काट्यांनी निदान नाती जपली असती ,

उगाच गुंतलो होतो पाकळ्यात मी...

निखा-याची धग आता जाणवत नाही ,

इतके दिवस होतोच की वणव्यात मी...

सावली आहे मी तुझी, म्हणाली होतीस ;

म्हणून आयुष्यभर राहिलो उन्हात मी...

2 comments:

akam said...

awesome ! good expression ...

Vishal said...

प्रेमभंग झाल्यावर येणार्‍या मनातील भावना छान व्यक्त केल्यात... त्या कळीचे मन व्यक्त कॅरणारी पण एखादी कविता हवी.
तसेच आपल्या अंगणात फुलांचा सडा पाडताना त्या झाडाला वेदना होत असतील अशी कल्पनाही कधी केली नव्हती.