Monday, July 03, 2006

पुन्हा पावसाची वाट पहाते आहे -Asmita

पुन्हा पावसाची वाट पहाते आहे

खिडकीतून बाहेरचा पाऊस पाहिला की मला तुच आठवतोस
माझ्यासाठी प्रश्न घेउन समुद्रकिनाऱ्यावर उभा असतोस

श्रावणातला तो पाऊस नि समुद्राच्या खळाळत्या लाटा
क्शितिज पहाणारी मी नि माझ्या विखुरलेल्या बटा

माझ्या समोरच्या त्या द्रुष्यात तू माझा हात हातात घेतोस
"आयुष्य तुझ्यसोबतच जगायचय मला" असे आश्वासन त्या स्पर्शातून देतोस

माझ्यासमोरच मळभभरली दुपार हळुवार उजळत जाते
नवीन स्वप्नान्चे कारन्जे माझ्या मनात नाचत रहाते

त्या अपेक्शा त्या आशा मला माझ्या डोळ्यात दिसतात
मझ्यावतीने उत्तर देणारे समुद्राचे हुन्कार घुमतात

पाऊस थाम्बतो, वारा भिरभिरतो, मी पुन्हा वास्तवात येते,
सगळी स्वप्ने खरी करणाऱ्या तुझ्या बाहुन्चा आधार घेते

ती रेशीमभेट, ती दुपार, रोमारोमात फुलते आहे,
तुझ्या छातीवर डोके ठेवून मी पुन्हा पावसाची वाट पहाते आहे

No comments: