Friday, July 28, 2006

पाऊस,अन तु.. prem

तो पाऊस,अन ती तु..
दोघांच्यात किती साम्य आहे नाही?
दोघेही मला हवेहवेसे,
वारंवार भेटावेसे वाटणारे..
मला "गारवा" देणारे,
अन मन शितल करणारे..
दोघांचाही तो सुगंध ..
मन तॄप्त करणारा,अन श्वासात भरुन राहिलेला..
दोघही मनातल्या मनात माझ्याशी गप्पा मारणारे...
अन निख्खळ आनंद देणारे..
पण......
कधीकधी दोघंही चिंब भिजवणारे..
तो पाण्याने अन तु आसवांनी.......

1 comment:

akam said...

thats amazing expression .....!