स्वप्न.......
बरसत्या क्षणासाठी
आभाळही व्याकुळले...
स्वप्न बनुन काही थेंब..
ओंजळीत बरसले.
एक एक क्षण उमलताना..
प्राजक्त बहरुन आला..
अबोल सुगंधी श्वासांनी..
वाराही धुंद झाला..
ह्र्दयाची श्रवणगाणी..
पाऊस बनुन रिमझिमलि..
आसवल्या ओंजळीत..
मुग्ध प्रीत अवतरली
बरसत्या क्षणामध्ये.
मग...आभाळही भिजले..
हलकेच हूल देउन..
स्वप्न पापणीत उतरले
कल्याणी
1 comment:
MAST KAVITA !!!
Post a Comment